पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # जुलै-२०१०
सैनीकांच्या आधी महाराष्ट्रात कार्यकर्ते रहात होते. महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचं मोहळ ही ओळख महाराष्ट्र अनेक वर्ष अभिमानानं अंगाखांद्यावर खेळवत आला आहे. आजही कुणी तसं म्हटलं तर पुर्वीचा काळ आठवून माणूस भुतकाळात रमतो. गांधीवादी, समाजवादी, मार्क्सवादी विचारानं या कार्यकर्त्यांची फळी महाराष्ट्राला दिली. मंथन, मनन, चिंतन, वाचन, श्रवण हे शब्द नव्या परिमाणासकट कार्यकर्त्यांच्या रोमारोमात भिनायचे. कार्यकर्ता बोलायला लागला की त्याच्या शब्दाशब्दातून विचाराची एक एक लडी उलगडत जायची. 'आपण समाजाचं काही देणं लागतो' हे केवळ वाक्य नसायचं तर त्यासाठी माणसं आपल्या आयुष्याची आहुती द्यायचे. आपापल्या कुवतीप्रमाने जो तो समाजाला आपलं योगदान देण्यासाठी आतुरलेला असायचां. भारलेला असायचा.
त्या काळात नेताही आपली ओळख 'कार्यकर्ता' अशी करुन द्यायचा. तेव्हा तो आपला, आपल्यातलाच वाटायचा. आपल्यासारखेच त्याचे कपडे असायचे. आपल्यासारखंच त्याचं घर असायचं. असलीच तर आपल्यासारखीच त्याची नोकरी असायची. आपल्यासारखेच त्याचेही प्रश्न असायचे. आपलेपणावर वसलेली समाजाची व्यवस्था असायची. सामान्य कार्यकर्यांची दु:खं नेत्याला माहीत असायची आणि नेत्याच्या घरातला रुबाब कार्यकर्त्यालाही माहीत असायचा. नेत्याच्या साधेपणाची समाजात चर्चा असायची आणि कार्यकर्त्याच्या तडफेचं नेत्याला कौतुक असायचं.
शिवसेनेच्या जन्माबरोबर कार्यकर्ता मेला. त्याच्या जागी सैनीक आला. पण त्याच्या ठाई जुन्या कार्यकर्त्याचा आब, पोक्तपणा नव्हता आणि सैनीकाची शिस्तही नव्हती. शिष्ठाईची जागा हुल्लडपणानं घेतली. विचाराची जागा आदेशानं घेतली. विचार आचरणासाठी असतो आणि आदेश फक्त पाळण्यासाठी. विचारांच्या आचरणात भुतकाळाचं तारतम्य असतं आणि भविष्याचं भान असतं तर आदेश पाळण्यात निव्वळ वर्तमानाचं दडपण आणि अस्तीत्वाची भीती असते. या अस्तीत्वाच्या भीतीनं माणूस फक्त गांगरुन जातो. भेदरुन जातो.
शिवसेनेच्या जन्मापासून आजतागायत मराठी माणूस फक्त भेदरलेल्या अवस्थेत आहे. त्याला कसल्यातरी अनाठाई भीतीनं, चिंतेनं ग्रासलं आहे. ही भीती ही चींता कशाची आहे हे त्यालाही अजून कळलेलं नाही. आपण मराठी असल्याचा अभिमान वाटण्याऐवजी तो त्याचा न्युनगंड बनला. मराठी माणसाचं मराठीपण समजून घेण्यात मराठी माणूस कायम चुकत राहिला. त्याला फक्त सण-समारंभ साजरे करण्यात गुंतवून ठेवण्यात आलं. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला शिकवलं पण महाराजांची थोरवी शिकवली नाही. इतिहासाची पानं चाळून दाखवली पण वाचायला दिली नाहीत. वर्तमानातली तत्कालीक दु:ख दाखवली पण भविष्याचं स्वप्न दिलं नाहीत. त्यामुळे गेली चाळीस बेचाळीस वर्षे मराठी माणूस फक्त शाखेभोवती घुटमळत राहीला. न चुकता दसर्याला शिवाजी पार्कवर आणि वाढदिवसाला मातोश्रीवर हजेरी देत राहीला.
इंग्रजांच्या काळापासनच मुंबई ही एक व्यापारी पेठ आहे. इथे कुणासाठीही व्यापार- उदीमाची संधी सारखी आहे. हे दुर्दैव आता आपण मुकाटपणानं सोसतो आहोत. पण वडापावच्या गाडया, आणि झुणका भाकरीची केंद्र उभी करण्यापलिकडे शिवसेनेनं मराठी व्यावसाईकाला कोणतीही ताकद दिली नाही. शिवसेनेने व्यावसाइक तयार केले असतील तर ते फक्त कॉन्ट्रक्टर धर्तीचे. त्याना व्यावसाईकाच्या दॄष्टीपेक्षा मुकादमाची नजर दिली. नोकरीच्या लढयात त्याला जेवढं गुंतवून ठेवलं त्याच्याऐवजी जर त्याला व्यवसाय-धंद्याचेही धडे दिले असते तर आज पाचाचे पंचवीस झाले असते. त्यामुळे आज मराठी माणसाला आहे त्या परस्थीतीत मारुन-मुटकुन जगावे लागत आहे. नोकरी सांभाळण्याच्या कसरती करीत आयुष्यभर नोकरदार बनुन राहण्यापेक्षा तो आज मालक बनून ऐशोआरामात राहिला असता. तरीही जे मराठी व्यावसायीक म्हणून मोठे झालेले आहेत ते स्वतःच्या कष्टानं उभे राहिलेले दिसतात. पण त्यांचाही वर्गणीपलिकडे आणि सोविनिअरच्या जाहिराती पलिकडे यांनी कधी विचार किंवा वापर केला नाही. त्याचे भोग मराठी माणूस भोगतो आहे, भोगणार आहे. आज नोकर्यांची संधी नाही आणि भांडवलांची तजवीज नाही. त्यामुळे मराठी माणसाची 'ना घर का ना घाट का' अशी अवस्था आहे.
शिवसेनेच्या पाठीपुढे असलेला बहुसंख्य मराठी माणूस हा अर्धामुर्धा शिकलेला आहे. गावातून मुंबईत आलेला आहे. झोपडपट्टीत, चाळीतून राहणारा आहे. त्याला शिवसेनेचा आधार वाटणं हे स्वाभावीकच होतं. अर्थकारणाच्या लढाईत त्याला गोंजारणारं कुणीतरी हवंच होतं. या अर्ध्याकच्या मराठी माणसाच्या हातात कायमचं जगण्याचं हत्यार देण्यापेक्षा शिवसेनेनं त्यालाच आपलं हत्यार बनवलं. त्यामुळे मोर्चा असेल, बंद असेल, सभा असेल तेव्हा हाच मराठी माणूस व्यवस्थीत वापरला गेला. मोर्च्याला, सभेला, बंदला वेगळे आणि सेटींग, मांडवलीला वेगळे. त्यामुळे यातली काही मराठी माणसं कायमची मोठी झाली आणि उरली ती कायमसाठी आहे तिथंच राहीली.
महाराष्ट्रात गेली पन्नास वर्षे (मधली साडेचार वर्ष वगळता) सत्तेच्या मखमली खुर्चीवर काँग्रेसचं सरकार आहे. आणि लोकशाही शासन व्यवस्थेत कोणत्याही खुर्चीला सर्वसामान्याच्या दु:खापेक्षाही हितसंबधाचं राजकारण करण्यातच जास्त रस असतो. ते राजकारण खेळण्यात काँग्रेस पटाईत आहे. सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी कोणताही संबध नसतांना ते निवडणूकीच्या शर्यतीत कायम निवडून येतात यातच सारं येतं. आणि अशीच अवस्था राहिली तर कदाचीत यापुढेही हेच होत राहील. कोणतेही सरकार समाजाच्या विकासाचा विचार करीत नाही असे नाही. पण त्यात सर्वसमावेशकता असते. अमुक एक समाज त्यांच्या डोळ्यासमोर नसतो. त्यामुळंही सरकार मराठी माणसाचा विचार करीत नाही असं वाटत रहातं. आणि हे वाटत रहाणं अनेकदा गैरसमजातून अधीक गहीरं होत जातं. त्यामुळं वेळीच सत्तेचाही अर्थ शिवसेनेनं मराठी माणसाला समजून द्यायला हवा होता. ते ही ते करुन देण्यात चुकले. त्यामुळं १९९५ साली एकदा संधी दिल्यानंतर पुन्हा मराठी माणसांनी शिवसेनेला सत्तेत येऊ दिलं नाही. यापुढे येऊ देतील असं वाटत नाही.
शिवसेनेनं मराठी माणसाला मराठीचा गोजीरा गुलाबी गाजर दाखवून हिंदुत्वाचा कडवट सफेद मुळा हातात दिला तो भाजपमुळं. पण ती व्यापक सत्तेची निकड होती. ती काळाची गरज होती. हे समजावून सांगण्यात शिवसेना अपयशी ठरली. आणि टिकेची धनी झाली. आता आपली गरज संपल्याची भावना मराठी माणसात बळावत गेली. आणि शिवसेनाही सैरभर झाली. ते सैरभैरलेपण ना बाळासाहेबाना थोपवता आलं त्या त्यांच्या वारसांना. त्यामुळे शिवसेना आतून फुटत गेली. दुभंगत गेली. शिवसेनेतले काही महत्त्वाचे आधार दूर गेले हे त्याचे दृष्य परिणाम. पण शिवसेनेनं मराठी माणसाला वेळीचं शहाणं केलं नाही. श्रीमंत केलं नाही. सत्तेचं, बेरजेचं गणीत समजावून सांगीतलं नाही ही खरी मेख आहे.
बाळासाहेब आता वयानं थकले आहेत. त्यांच्या चित्तवृती अजुनही जाग्या आहेत, ताज्या आहेत. तोच करिश्मा आजही आहे. पण त्यालाही फक्त भावनांचा आधार आहे. आणि मराठी समाजात त्यांच्यासाठी दयेची, केविलपणाची झालर आहे. बाळासाहेबांच्या बोलण्यात पुर्वीच्या राजकारणाची, सत्तेची आग नक्कीच नाही. असूही शकत नाही. उध्दव ठाकरे उसनं अवसान आणतात पण अजुनही कठीण समय येता ते बाळासाहेबांच्या पाठीमागे लपतात. राऊत, जोशी, देसाई, नार्वेकर यांना आपल्याच जीवावर शिवसेना आहे असं वाटतं पण यांच्यावर मराठी माणसाचा विश्वास नाही. त्यामुळे आता असलेला मराठी माणूस फक्त पुर्वपुण्याईवर शिवसेनेच्या पायाजवळ बसला आहे. पण ही मृत्युसमयी रात्र जागवण्यासारखी स्थीती आहे. भविष्यात शिवसेनेत उरलेले काय दिवे लावणार हे कोणत्याही दिवशी कोणतंही चॅनेल पाहिल्यावर समजतं. कुठलंही वर्तमानपत्र काढलं की वाचता येतं. समाजात खाजगीत बोलल्यावर कळतं. मराठी माणसाचा कानोसा घेतल्यावर लक्षात येतं. वाईट याचं वाटतं की शिवसेनेचा अंत अश्या पध्दतीने व्हावा असं मराठी माणसाला नक्कीच आधी कधीच वाटत नव्हतं याचं. शिवसेनेचा मृत्यु समोर दिसतो आहे. हे मानायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
प्रवीण धोपट
99672 93550
pravindhopat@gmail.com
Friday, July 2, 2010
Tuesday, June 22, 2010
मदनपुरा
पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # जून-२०१०
"गांडू, अपनी मा चुदा रहा है क्या?", कितनी बार तेरेको बोला की कपडे को हात मत लगा, फिर भी सुनता नही है साला. भैंचोत. झटापटीचे शब्द कानावर आले आणि मागे वळून पाहिलं. तर एका फळं विकणारा पोरगा शिरा पराठा विकणार्या पोराची कॉलर धरुन त्याच्या कानाखाली खेचण्याच्या तयारीत होता. आजू-बाजूचे चार-सहा जण गोळा झाले आणि ते दोघं आपापल्या धंद्यावर जाऊन बसले.
भांडणाचं कारण साधं होतं. एकमेकांना लगडून गाडया लाऊन बसलेले हे धंदेवाले. शिरा पराठा विकणार्या पोरानं हाताला तेल लागलं ते पुसण्यासाठी फळवाल्याच्या धंद्यावरचा फडका वापरला होता. त्यामुळं चिडून जाऊन त्यानं त्याच्यावर हात उगारला होता. क्षणभर असं वाटलं ते एकमेकांचा जीव घेतील. पण पाच-दहा मिनिटातच ते नंतर पुन्हा काहीच न घडल्यासारखे शांत. आपापल्या गिर्हाइकात गढून गेले.
रात्री साडेबाराची वेळ. मदनपुरा. नागपाडा जंक्शनजवळ रात्रभर जागा असलेला हा इलाका. खाण्यापिण्याच्या स्टॉलनं सजलेला. रंगारंग लाईटसचा उजेड. वीस-बावीस वर्षांच्या तरुण पोरांची तोबा गर्दी. हलचल. गडबड. गोंधळ. मेणकापडाच्या छपरांनी झाकलेले छोटे छोटे स्टॉल्स. पावसाची चिकचिक. पायात लुडबुडणारा चिखल. रस्त्यावरच्या डबक्यात साचलेलं गढूळ पाणी. बकर्या, गुरा-वासरांची चरण्यासाठीची धडपड. बाईक्स, टॅक्सीची ये-जा. आणि हातगाडया, दुकानाच्या पायर्यांवर लवंडलेली माणसं.
झियाउद्दीन बुखारी चौकापासून बाबा सरवर चौका पर्यंत पसरलेला लांबचलांब साधारणतः अर्ध्या किलोमिटरचा हा रस्ता चोवीस तास गजबजलेलाच असतो. जरीकाम करणारे छोटे-छोटे व्यवसाय. बॅगा, चपला बनवण्याचे कारखाने इथे दिवसरात्र सुरु असतात. मुख्यतः युपी-बिहार वरुन आलेले कारागीर आपली रोजीरोटी इथं कमावतात. कुणीही सोबत आपल्या कुटुंबाला बायकापोराना आणलेलं नसतं. एखादाच या धंद्यातून वर आलेला आणि पुढं शेठ बनलेला आपला कुटुंबकबीला आणतो. तोपर्यंत त्यांच्या पोटापाण्याची सोय लावण्याचं काम हा रस्ता करतो. मौलाना आझाद रोड असं याचं नाव.
इथला कामगार म्हणजे साधारण आठ-दहा ते विस-पंचविशीतला तरुण वर्ग. घामानं मळकट कळकट झालेले कपडे. पायात रबरी-प्लॅस्टीकच्या चपला. वर भोकाभोकांची बनीयन किंवा टिशर्ट. बर्याचजणांच्या डोक्यावर मुसलमानी जाळीदार गोल टोपी. हातात सिगरेट-वीडी नाहीतर मोबाईल. वयस्कर कामगारांच्या कमरेवर चौकटची लुंगी, वर बनीयान किंवा कुर्ता. जुन्या जाणत्या अनुभवी धंदेवाल्याच्या अंगावर पांढरेशुभ्र झब्बे-लेंगे.
मोकाट बकरे, वासरं केळ्यांच्या सालीवर, कागदांवर ताव मारीत होती. कोंबडयांची हाडं म्हणजे कुत्र्यांसाठी मेजवानीच. अधुनमधुन पावसाची सर यायची आणि ती दुकानांच्या वळचणीला घुसायची. मधेच झोपलेल्यापैकी कुणीतरी झोपमोड झाली म्हणून त्यांना शिवी हासडत उठायचा. पुन्हा मुकाट ती आपला रस्ता बदलायची. रात्रभर ही मुकी जनावर इकडून तिकडे फिरत राहतात.
अधुनमधुन बाटल्यांची किणकीण ऐकायला येते. ती खुण असते मॉलीशवाल्याची. दारोदार कपबशी विकणारे ज्यापध्दतीनं आपल्या कपबशीचा आवाज करतात. तसाच तो वाटतो. चिराबाजार, मरीनलाईन्स, कामाठीपुरा ते मदनपुरा अशी पायपीट करीत ते मॉलीशवाले आपलं गिर्हाईक शोधत फिरत असतात. हाफ कॉर्टर (मराठी माणसाला ती 'चपटी' या नावानं परिचीत आहे) साईझची एक खोबरेल तेलाची आणि दुसरी राईच्या तेलाची अश्या दोन बाटल्यांच्या भांडवलावर कुणीही रात्रभर अडीचशे तिनशेचा धंदा करतो. २५ वर्षाचा अमित इथे गेल्या चार वर्षा पासून हा धंदा करतो. माहीमला राहतो. रात्री आठच्या दरम्यान तो इथे पोचतो. आणि रात्रभर मॉलीशचा धंदा करतो. एवढी मेहनत करुन एखादया गुजराती भाभीचं आमंत्रण म्हणजे दिवाळी. पैसेही चांगले मिळतात आणि टिंबटिबही, असं तो म्हणाला. वेश्याही त्यांच्याकडून मॉलीश करुन घेतात. पण पैसे देत नाहीत. शिव्या देतात. ओळख झाल्यावर फुकट अंग दाबून घेतात. पण त्याला इलाज नसतो. अमित या धंद्यात चांगला मुरलेला दिसला.
नर्गीस बुरखा, ए१ मुस्तफा ज्युस सेंटर, शबरी बेकरी, बिसमिल्लाह रेस्टोरंट, नॅशनल हॉटेल, मामू फिटींग्ज, समुंदर, नॅशनल हॉटेल्स यासारख्या दुकानांवर खास टिपिकल पाटया इथे दिसतात. अधेमध्ये उर्दु-हिंदीतले पोस्टर्स, स्थानीक नेत्यांची पोस्टर्स आपले लक्ष वेधुन घेतात. मशीदीतही रात्री उशीरापर्यंत लोकांची ये-जा चालू होती.
डॉ. मोहम्मद रफीक या नावानं इथला दवाखाना रात्री उशीरापर्यंत खुला होता. त्या दवाखान्यावरच बंद करण्याची अधिकृत वेळ रात्री अडीचची होती. त्यानंतरही माणसं बाहेरच्या बाकडयांवर बसून होती. दवाखाना अर्थातच नोंदणीकृत (रजिस्टर्ड) आहे. त्यावर आय-३३७९३ असा नंबर आहे. डॉक्टर एम.डी. आहेत पुढे कंसात ए.एल.टी अशी इंग्रजीत अक्षरं लिहिलेली आहेत. त्यानंतर बी.यु.एम.एस., सी.सी.एच. अशी अक्षरंही आहेत. त्यामुळे डॉक्टर भरपूर काही शिकलेला आहे असा भास होत राहतो. इंग्रजी अल्फाबेटसचा इतका अर्थशुन्य तरीही अर्थपुर्ण उपयोग दुसरा कुठेही पहायला मिळणार नाही. चौकशीत लक्षात आलं की इथं येणार्या तरुणांचे आजार सर्दी, ताप-खोकल्याचे असतातच पण बहुतेक करुन गुप्तांगाचे जास्त असतात.
इथुन पाचच मिनिटाच्या अंतरावर कामाठीपुरा सुरु होतो. कामातून वेळ मिळाला की तिथं विरंगुळयासाठी जाणारे असतात. तिथुनच काहीजण असे कमरेखालचे रोग घेऊन आलेले असतात. पाच-दहा मिनिटांच्या अंतराने त्या रस्त्यावर वळणार्या चार-पाच जणांचे घोळके दिसतात. बाकी दिवसरात्र कोंदट जागेत काम करुन, त्याच त्याच कपडयात वावरुन, घामाचे कपडे तसेच अंगावर वाळगून, आंघोळीचा पत्ता नाही, स्वच्छतेचा मागमूसही नाही यामुळे बर्याच जणांना चामडयाचे आजार झालेले असतात. ती सगळी तरुण पोरं या डॉक्टराच्या टार्गेटवर असतात. भगंदर, बवासीर, मुळव्याद च्या इलाजाच्या एका डॉक्टरचं क्लिनीकही याच भागात दिसलं. त्याचीही चलती असावी.
खाणं-खिलवणं हे या गल्लीचं वैशिष्टय. चरचणार्या तेलाचा, डालडयाचा खमंग वास वातावरणात भरुन राहिलेला असतो.. चिकन बिर्याणीचा घमघमाट. लालेलाल दगडी निखार्यावर भाजलं जाणारं सिख कबाब- चिकन तंदुरी, बुर्जी पाव, भगव्या रंगाचा शिरा (हलवा) आणि त्यासोबत मैद्याचा पराठा, बेकरीतली बिस्कीटं, केक, पाव. शानदार रचुन ठेवलेले चिकट मातेरी खजूर, केळ्यांचा ढिग आणि फळांची आरास सोबत पानीकम चहाचा झुरका आपल्याला हैराण करते. नसलेलीही भुक चाळवते.
रात्री झोपेत एकजण मोबाईलवर काहीतरी पहात पडला होता. आम्हाला पाहिल्यावर गडबडीन मोबाईलची स्क्रीन त्यानं फिरवली. विचारलं काय? तर 'कुछ नही', म्हणाला. मी म्हणालो, मेरे पास भी है, चाहिये क्या? तर खुलला. त्यानं सांगीतलं. मेरेको उदर (कामाठी पुर्याकडे बोट दाखवून) जाना अच्छा नही लगता. तो अपना टाईमपास मोबाईलपर. त्याच्या मोबाईलमध्ये सेक्सी फिल्म्स होत्या. तो म्हणाला, अभी आदत सी हो गयी है. फिल्म देखे बिना निंद नही आती.
रात्री तीनच्या सुमारास धिम्या गतीनं एक पोलिस व्हॅन कॉलीस येताना दिसली. झरझर मॅसेज फिरला. आणि चालू असलेले बल्ब गेले. भरभरणारे स्टोव्ह गप्प झाले. मोबाईल आणि सीडी प्लेअरवरच्या कवाल्या बंद झाल्या. हातगाड्यांवर पसरलेल्या खाण्याच्या जिन्नसांवर पांघरुणं पडली. गाडयांजवळचे कामगार पांगले. दोन क्षण चिडीचुप. पोलीसांची गाडी पुढे सरकत गेली. आणि पुन्हा दिवे लागले. स्टोव्ह सुरु झाले. पुन्हा गलबला झाला.
मी विचारलं, पुलीस को इतना क्युं डरते हो? हप्ता नही देते क्या? तर म्हणाले, उनका जितना पगार नही उतनी आमदानी इस रोड से उनको हप्तेसे मिलती है. ऐसे तकलीफ नही देते किसिको. लेकीन उनकी इज्जत रखनी पडती है. एक पन्नाशीतला माणूस पोलीसाला शिव्या द्यायला लागला. तो तिथंच एरियात बफ मशीन चालवतो. म्हणाला, पुलीस की जात हरामी है. उनको कितना भी खिलाव उनकी आदत नही छुटती. लेकीन ये हराम का पैसा है. इसलीये गरीब मजदूरकी हाय उनको लगती है. उनके बालबच्चे देखो. लुले निकलते है. अच्छे निकले तो बेकार, लफंगे निकलेंगे. बीवी बीमार रहेगी. मी विचार केला. कुठं बघायला गेला असेल हा त्या पोलीसांची कौटुंबीक पार्श्वभुमी. पण तो त्याच्या मनातला राग बोलत होता. कदाचीत पोलीसांचं असंच व्हावं असं त्याला वाटत असावं का?
मुंबईतल्या कित्तेक खाऊ गल्यांची कौतुकं मी ऐकली आहेत. पण तिथं पोटापेक्षा जिभेचेच चोचले जास्त पुरवले जातात. इथलां खाउ हा कष्ट करणार्या माणसासाठी आहे. रात्री फक्त पन्नास ग्रॅम शिरा-पराठा किंवा दोन केळ्यांच्या वर पाणी पिऊन झोपणार्या माणसाचं जेवण मला पुर्णब्रम्हापेक्षाही ग्रेट वाटलं.

Monday, June 14, 2010
अंदाज म्हणाला चुकलो...!!!
पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # जून-२०१०
अंदाज हा माणसाच्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. माणसाच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं याना धीर देण्याचं काम अंदाज करतो. अंदाजावर आंधळा चालतो, शेतकरी धान्य पेरतो, व्यावसाईक पैसा फेकतो, जुगारी बोली लावतो आणि सर्वसामान्य माणूस आपलं आयुष्य ढकलत असतो. अंदाजाच्या आधारावर माणसाचं सगळं जगणं उभ असतं. माणसाच्या भविष्यातील प्रत्येक कृतीचा आधार पुन्हा अंदाजच असतो. अंदाजाशिवाय माणूस शुन्य आहे. अंदाजानं चुकू नये नेहमीच बरोबर आणि वेळेवर यावं असं आपल्याला वाटतं ते याचसाठी.
अंदाज हा काही हवेत बांधायचा इमला नव्हे. त्याला काही घटनांची, संदर्भांची साथ असते. इतिहासाची जोड असते. आणि एकाच घटनेविषयी जेव्हा एकापेक्षा अनेकजण एकाच पातळीवर येऊन एकसारखा अंदाज व्यक्त करतात तेव्हा त्याला एका अर्थानं समाजाची मान्यता असते. अणि अनेक अर्थानं तो अंदाज ती त्या समाजाची मागणीही असते.
हे अशासाठी, की याआधी प्रत्येक वेळी मराठी माणसाचा अंदाज चुकला आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीची प्रक्रीया इतकी जिवंत होती की त्यावेळी वाटले होते. आता मराठी माणसाचे, मराठी भाषेचे राज्य येणार आणि मराठी माणसाचे भले होणार. त्याला कारणेही तशीच होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढयातील नेते खर्या अर्थाने सर्वसामान्यांचे प्रतिनीधी होते. एस.एम., डांगे, ठाकरे, अत्रे या नेत्यांचे आर्थीक, सामाजीक, सांस्कृतीक जीवन सर्वसामान्याच्याच पंक्तीतले होते, सर्वसामान्य माणसाच्या घरातल्या अडचणी त्यांच्याही घरात होत्या. त्यांच्या व्यक्त्तीगत इच्छा आकांक्षा कवडीमोलाच्या होत्या. सार्वजनीक जीवन उघडया पुस्तकासारखे होते.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला तर मराठी माणसाचं नक्की भलं होणार असा अंदाज होता. लढयाचं सुत्रही तेच होतं. १ मे १९६० साली संयुक्त महाराष्ट्र जन्माला आला. पण त्यामुळे मराठी माणसाच्या आयुष्यात काहीही बदल झाला नाही. मुंबईचा भुगोल आहे तसाच राहिला. इतिहासाच्या पानात संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाची नोंद झाली. नागरीक शास्त्र नेहमीच काळानुरुप आपलं स्वरुप बदलत राहतं. फक्त यानिमित्ताने मराठी माणसाला साजरा करायला आणखी एक दिवस मिळाला इतकंच. लढयातले नेते वयानं थकले. काही गेले. सगळेच संदर्भ बदलले. सर्वसामान्य माणसाचा चेहरा फक्त लढतानाच दिसतो. इतरवेळी तो आपल्या पोटापाण्याच्या, घरादाराच्या व्यापात असतो. तसं यावे़ळीही झालं. पुढचे चालक-वाहक बदलले. त्यांनी आपले मार्ग आपल्या सोईनुसार बदलून घेतले. खादी-कुर्त्यातलं, फाटक्या चपलेतलं समाजकारण मागे पडलं. धोतरांचं, सफेद कपडयातलं, गांधी टोपीचं राजकारण सुरु झालं. सत्तेच्या राजकारणात मराठी माणसाचं भलं करायचं राहुन गेलं. यावेळीही अंदाज चुकला.
पुढे १९६६ साली शिवसेना जन्माला आली. मराठी माणसाला पुन्हा हुरुप आला. आता आपलं नक्की भलं होणार असं वाटलं. आपले रोजगार चोरतात म्हणून दाक्षिणात्यांवर राग निघाला. काही प्रमाणात मराठी माणसाला नोकर्या मिळाल्या. वडापावच्या गाडया, झुणका भाकर केंद्र, वर्गणी, वसुली असे छुटुरफुटुर धंदे सुरु झाले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेनं मराठी माणसाला सत्तेचं स्वप्नही दाखवलं आणि विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या राजकारणाला मोठा धक्का दिला. शिवसेनेची आंदोलनं, सार्वजनीक बंद मुंबईच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही लक्षात रहावी अशी झाली. तळागाळात शाखांचा वचक वाढला. कपाळावर केशरी टिळा, वाढलेल्या दाढया-मिश्या, सफेद चपला, सफेद कडक सफारी, क्रमाक्रमानं मोटारसायकली, चार चाकी गाडया, मनगटावर सोनेरी सैलसर घडयाळ, ब्रेसलेट, बोटात चार-सहा अंगठया, गळ्यात दोन-चार चैनी त्याला लटकवलेली वागनखं (यानीच वाघ संपवले असतील काय?), मागेपुढे आठ-दहा चेले-चमचे, तोंडात आवाज कुणाचा आणि गरजेला....जय भवानी-जय शिवाजी.
१९९५ साली भगवा झेंडा विधानसभेवर फडकला. नंतर मराठी सोडून हिंदु सुरु झालं. साडेचार वर्षांच्या सत्तेनं यांना पार बिघडवलं. काही जणांच्या पुढच्या पिढयांची सोय झाली. पण यात मराठी माणसाची कुतरओढ झाली. सत्तेत गेले ते काय बोलून गेले ते विसरले. त्यामुळे मराठी माणसानी त्यांची जागा त्याना दाखवली. यापुढे पुन्हा सत्तेत दिसलात तर याद राखा कामा अशी सक्त ताकीदच मराठी सांनी शिवसेनेला दिली आहे, असे वाटते. शिवसेना नावाचा विश्वास तुटला. मराठी माणसाचा पुन्हा एकदा अंदाज चुकला.
आता याच मराठी माणसाच्या खांद्यावर मदार आहे ती राज ठाकरे यांची. किंवा हेच वाक्य उलट करुनही वाचता येईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निमित्ताने मरगळलेला मराठी माणूस पुन्हा एकदा जागा झाला आहे. त्यामुळे जे शिवसेनेला द्यायला अनेक वर्ष लावली ती सत्ता किंवा सत्तेचा काही हिस्सा मराठी माणसानं मनसेच्या हातात पदार्पणातच दिला आहे. मराठी माणसानं ही घाई अश्यासाठी केली असावी की त्याला माहित आहे की आता फारच उशीर झाला आहे. आणि कदाचीत ही शेवटची संधी आहे.
मुंबईत माझं माझं म्हणावं असं मराठी माणसाच्या हातात आता फार कमी शिल्लक आहे. आशा लावावी असं एकच नाव आहे ते म्हणजे राज ठाकरे. त्यामुळे जे उरलं आहे ते टिकवण्यासाठी तुमचाच आधार आहे. गोरगरीब, सर्वसामान्य माणसाबरोबर तरुण, शिक्षित असा एक मोठा वर्ग आपल्या पाठीशी उभा राहतो आहे. तुम्ही काय बोलता, काय करता याकडे प्रत्येक मराठी माणूस डोळे लाऊन बसला आहे. तुम्ही त्यांचे आशास्थान बनला अहात. बलस्थान बनला अहात. ...मेरे पास राज ठाकरे है असं तो गर्वानं म्हणतो आहे. मराठी माणसानं विश्वासानं मान टाकावी असा एक शेवटचा खांदा आहे. मराठी माणसाचा हा विश्वास तुम्ही जपायला हवा.
आज सत्तेत असलेले तेरा आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी मिळालेल्या वेळेत जर आपापल्या विभागाचा स्वर्ग बनवला तर पुढचा उरलेला महाराष्ट्र यांच्या गळ्यात संपुर्ण सत्तेची माळ घालेल. पण जर हेच आता कारणं सागंत बसले तर मराठी माणसांनी यांना कोणती कारणं सांगायची?
गेल्या ५० वर्षाचा महाराष्ट्राचा, मुंबईचा, मराठी माणसाचा इतिहास बघितला तर त्याचा पुन्हा पुन्हा तेजोभंग झाला आहे. यानिमित्ताने त्याने तुमच्यावर टाकलेला विश्वास खरा ठरो. मराठी माणूस आणि आपण यानी एकमेकांसाठी घेतलेली ही शेवटची संधी आहे. तुमच्याविषयी मराठी माणसाने बांधलेला अंदाज अभंग राहो. खरा ठरो. मराठी माणसाच्या राजकारणात आणि सत्तेच्या सारिपाटात पुन्हा पुन्हा चुकलेला हा अंदाज कदाचित उद्या मराठी माणसाला म्हणेल मी हरलो तुम्ही जिंकलात आणि तुमच्यासमोर होत जोडून हाच अंदाज म्हणेल साहेब माफ करा चुकलो!

Tuesday, June 8, 2010
व्हिटी ते सिएसटी: रात्री १२.४३ नंतर
पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # जून-२०१०
रात्री १२.४३ ला पनवेलला जाणारी शेवटची गाडी निघाली की सातही ट्रॅक सुनसान होतात. मागे उरतात त्या फक्त ट्रॅकच्या लांबचलांब ओळी. डीजीटल घडयाळंयातल्या सेकंदांची जलधगती हालचाल. आणि बंद इंडीकेटरच्या कडांवर पेटलेल्या लाल दिव्यांच्या उभ्या माळा. अंधुक प्रकाश. चालू पंखे आणि लक्ष वेधुन घेणार्या जाहिराती.
व्हिटी स्टेशनाचं भव्य छत आता आपली नजर वर खेचून घेतं. उंचच उंच नक्षिदार लोखंडी कमानी. काळ्या पाषाणात कोरलेले कसदार खांब. गोल घुमट. भव्य दरवाजे. खांबावर कोरलेल्या पशुपक्षांच्या चेहर्याचे आकार. हे बघतांना आपल्याला फक्त इंग्रजाच्या कामाची, कलाकुसरीची आठवण येते. आपोआप आपल्या मुखात त्यांच्यासाठी कौतुकाचे, आभाराचे दोन शब्द आणि आताच्या प्रशासनासाठी दोन शिव्या. त्यानंतर व्हीटी स्टेशनाशी आपलाही संबध तुटतो. आणि आपला प्रवास सुरु होतो छत्रपती शिवाजी टर्मीनसवरुन. जे आपल्याला आपल्यासारखं आहे असं वाटतं.
प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरच्या लाद्या उखडलेल्या आहेत. लाकडांचे, डबराचे,लाकडी घोडयांचे, तुटक्या-फुटक्या सामानाचे ढीग इतस्ततः पडलेले आहेत. नवीन लावलेल्या (चिकटवलेल्या) लाद्यावर त्या अधिक चमकाव्या म्हणून एकजण पॉलीश मशीन फिरवतो आहे. त्या मशीनचा आवाज आपल्या मस्तकात जातो आहे. सफेद चिखलाचे पाट आपलीच आपल्यासाठी वाट काढताहेत. त्याचे ओघळ प्लॅटफॉर्म वरुन सरळ ट्रॅकवर पडताहेत. रेल्वेतून उतरणारी माणसं त्या ओघळावरुन लटपटताहेत. काही शिताफीनं त्या ओघळावरुन उडया मारुन जाताहेत. गाडया येत आहेत. जात आहेत. माणसं उतरताहेत. चढताहेत. वेळ चालला आहे. चालणार आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर असलेल्या सुरक्षा चौकीतून कुणीतरी एखाद-दुसरा एकदोनदा आतबाहेर करतं. इकडेतिकडे बघुन परत आत. पोलीस उरलेल्यांना पळवायच्या मागे. पोलीसाच्या हातातला दांडा उगारुन मागे जातो त्यासरशी गुढग्यात जरासा वाकलेला कुणीही दुसर्या क्षणाला सटकलेला असतो. एक वेडसर बाई पोलिसाच्या अंगाशी झटत रहाते. दांडा उगारल्यावरही ती हटत नाही. हसत- बडबडत राहते. तिथं आधिच ठरल्यासारखी एक महिला पोलिस पुढे येते आणि आता तीच बाई तिला बघुन सरळ चालायला लागते. थेट बाहेरचा रस्ता धरते.
रात्री कुणालाही प्लॅटफॉर्मवर वस्ती करायला थांबायला बंदी असते. तरीही प्लॅटफॉर्मचे सगळेच दरवाजे बंद होत नाहीत. शेवटाची ट्रेन गेल्यावरही काहीवेळ दोन स्टॉल सुरु असतात. रिफ्रेश नावाच्या हॉटेलात आवराआवर चालू असते. पोलिस कक्षात दोन-चार पोलीस गप्पा छाटत बसलेले असतात. माणसं इकडून तिकडे करत राहतात. पोलिसातले काहीजण नकळत आल्या-गेल्यावर लक्ष ठेवतात. विपरीत काही घडण्याची शक्यता मावळते. कोपर्यावरची मुतारी रात्रभर उघडी असते. बंद असती तरी फरक पडला नसता. स्टेशनच्या पच्छिमेला अनेक ठिकाणी छोटया-छोटया कोपर्यात धारेचा आवाज ऐकू येत राहतो. उजेड मिसळलेल्या काळोखातही मुताचा वास आपल्याला ऍलर्ट करीत राहतो.
आता हार्बर- मध्य रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाडया जिथुन सुटतात तिथंल्या मोलळ्या जागेत माणसं आपल्या सामानासह स्थिरावतात. बायका-पोरं-सामानाचा गलका झालेला असतो. लांबरुद मोकळ्या जागेत किमान दोन-अडीच हजार माणसं असावीत. कुणाला बाहेरगावी जाणार्या रात्रीच्या गाडया पकडायच्या असतात. कुणी कुणाला सोडायला आलेले असतात. तर कुणी येणार्याची वाट पहात असतात.
मेन लाईनच्या प्रवेश दारावरच चौकशीची खिडकी आहे. खिडकीचा व्यास दहा बाय दहा इंचाचा असावा त्यात आळीपाळीनं किंवा कसंही विसेक माणसं भांबावल्यासारखी काहीही विचारीत असतात आणि आत बसलेला त्याना शांतपणे उत्तरे देत रहातो. कुणाच्या प्रश्नाचे उत्तर कोणते हे ज्याने त्याने समजून घ्यावे.
मागच्या बाजुने टॅक्सीना आत यायला रस्ता आहे. टॅक्सी तडक आत आल्यावर तिथे ट्रॅफीक पोलिस असतात. ते टॅक्सीला मार्ग दाखवतात. जो टॅक्सीचालकांना अधिच माहित असतो. पण डयुटी म्हणजे डयुटी. सामानाच्या बॅगा, खोकी, माणसं जिथुन आतल्या लॉबीत प्रवेश करतात तिथं ACIL REPISCAN नावांच एक मशीन आहे. त्याच्या घरंगळत्या पटटयावर सामान ठेवलं जाणं अपेक्षीत असतं. पण तिथं ऐछिक असतं. ज्याला सामान ठेवायचं तो ठेवतो. ज्याला नाही, त्याला कुणी विचारीतही नाही. सोईसाठी एन्ट्री आणि एक्झीट साठी वेगवेगळे गेट आहेत. पण वेळेला जे गेट मोकळं आहे तिथुन माणसं पोलिसांच्या समक्ष इकडून तिकडे करीत असतात. साडे-दहा अकरापर्यंत पोलीसांचे घोळके दिसतात. नंतर एखाद-दुसरा. इकडे-तिकडे. ACIL REPISCAN जवळच्या गेटमधून आतबाहेर जाणार्या माणसांची मोजदाद होते. वाचले तर दोन गेटवर वेगवेगळे आकडे होते. एकात ५३,३०४ तर एकात ७०. पुन्हा आतबाहेर केलं आता पहिल्या गेटवर एक आकडा वाढला होता. दुसर्या गेटवर सत्तरच. आजही सत्तरच असेल.
कॅमेरे जागोजाग दिसतात. दिसणारच. २६ नोव्हे.२००८ चा हल्लाच तसा होता. पण जर माणसांच्या, मशीनच्या परिणामकारक वापराविषयी जर अशी हेळसांड होत असेल तर पुन्हा एखादं अघटीत घडल्यानंतरच त्या कॅमेरात टिपलेली चित्र चॅनेलसाठी फक्त ब्रेकींग न्युजच्या कामी येणार आहेत काय? असा प्रश्न पडतो.
स्टेशनवर जिथेजिथे गेट आहे तिथेतिथे एक चौकोनी प्रवेशदार आहे. त्यातून आत-बाहेर जाताना टूं टूं असा आवाज येतो. आवाजाची मजा वाटते म्हणून एखादा बालबुध्दीचा माणूस पुन्हा पुन्हा आत-बाहेर करतो. त्या चौकोनांचा संबध सुरक्षेशी असावा. पण तिथं रक्षकच हजर नसतो. त्या चौकोनांचा उपयोग फक्त वर्धापन दिन किंवा सत्यनारायणाच्या महापुजेच्या दिवशी बल्बच्या माळा सोडायला होत असावा. रेतीच्या गोण्या रचुन ठेवलेल्या चौकोनात पोलीस बंदुक रोखुन उभे असतात. हे कसाबच्या हल्ल्यानंतर सुचलेलं असावं. एक जागी न हलता-बोलता उभ राहणं ही एक प्रकारची शिक्षाच आहे. ती उभ्या असलेल्याच्या चेहर्यावर जाणवते.
रात्री दोन-अडीच नंतर प्रवासी माणसंही पेंगलेली असतात. काही गाढ झोपेत असतात. झोपेत आपलं अंग/ अवयव खाजवणार्या किंवा आपलीच लाळ गिळणार्या माणसाकडे बघतांना कसंसंच वाटतं. मजाही वाटते. किळसही वाटतो. अधुन मधुन स्पिकरवर होणारी अनाउन्समेंट गर्दीला चाळवते. सगळ्यानाच आपल्या गाडीचं नाव, वेळ माहीत असते. सामानाची उचलापाचल, झोपलेल्याला जागवणं हा एक अनोखा खेळ रात्रभर फरका-फरकाने चालू राहतो.
जवळजवळ प्रत्येक गेटपाशी एक लाल रंगात रंगवलेलं टेबल दिसतं. ते खुर्चीला चिकटलेलं असतं. त्याच्यावर 'सुविधा' द कम्प्लेट फॅमिली शॉप ची जाहीतात असतेच. समर्थ सिक्युरीटी सर्वीस कडूनही होलसेल मध्ये फ्लेक्सचे बॅनर छापून घेतलेले दिसतात. एका बाजूला एक ऍबुंलन्स उभी असते. तिचा ड्रायव्हर कुठे आजुबाजूला दिसत नाही.
रेल्वेच्या आवारात जिथं जिथं जागा मिळेल तिथं पाटया, बॅनर लावलेले आहेत. त्यावरच्या सुचना आपलं मनोरंजन करतात. म्हणजे 'स्वच्छता हे परमेश्वराचे दुसरे नाव आहे', 'स्वच्छतेसाठी रेल्वेला सहकार्य करा'. प्रश्न पडतो 'स्वच्छता' हे कुठल्या देवाचे नाव आहे? कचरा डब्यातून ओसंडत असतो. जो उचलायला माणूस येतो तो पहाटे. तो नुडल्स उचलल्यासारखा कचरा उचलत होता. सकाळ पर्यंत कचर्याचा व्यास वाढतच जातो. फुकट पाण्याच्या नळाभोवती पाणी सांडतेच. त्याच्यावर फडका मारायला कुणीही नसतो. माणसं दिवस असो रात्र असो अखंड खातपीत असतात. कचरा साचतच जातो. माणसानी सहकार्य करायचे म्हणजे काय करायचे? 'कार इज नॉट वर्कींग' असं एअरटेलची जाहीरात असलेली चारचाकी खुली मोटारगाडी सामानाची ने-आण करण्यासाठी बाहेर उभी आहे. कुणी अपेक्षा केली आहे असल्या गाडया चालू असण्याची? लाल डगल्याचे हमाल आहेतच की..! 'प्रवासी सुरक्षा हेच आमचे ध्येय','सुरक्षा पडताळनीस मदत करा',आणि 'सुरक्षेला तडजोड नाही' ...हे करायला माणसं जाग्यावर तर असायला हवीत? आणि सुरक्षेच्या बाबतीत सर्वात मह्त्वाचं वाक्य म्हणजे, "स्वयं की सुरक्षा स्वयं के हात" ही सुचना वाचली की सुरक्षेचे सगळे प्रश्न निकालात निघाल्यासारखे वाटतात. पहाटेच्या दरम्यान एक सुरक्षारक्षक गेटवरच्या मशीनमध्येच डोक खुपसुन झोपला होता. एक पोलीस पायात चपला घालून आणि हातात दांडा घेउन फिरत होता. असे कर्मचारी दुश्मन फुटाच्या अंतरावर आल्याशिवाय काय करु शकतात? सगळ्यानाच आतंकदाद्याला मिठी मारायची संधी दरवेळी मिळेल, असं होणार नाही. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत नुसती बॅनरबाजी करण्यापेक्षा सतर्कच रहाणे फायदेशीर ठरावे.
री-फ्रेश नावाचे एक हॉटेल चोवीस तास चालू असते. बाकी सगळ्या गोष्टींबरोबर तिथे दहा रुपयात जनता थाळी मिळते. त्याविषयी काही तक्रार असल्यास एक टोलफ्री नंबरही दिलेला आहे. चेक केला, तर तो चालूही आहे. असा नंबर झुणका भाकर केंद्रासाठीही दिला असता तर ती केंद्र आजही कदाचीत चालू असती. त्याच्याच बाजूला एक मुतारी आहे. मुतारीचा ऑपरेटर जुन्या हिंदी गाण्यांचा शौकीन आहे. पेन ड्राइव्हवर लोड केलेली गाणी तो रिमोट कंन्ट्रोलच्या आधारे बदलत रहातो. स्पिकरच्या आवाजाचा दणकाही मोठा असतो. त्या सुरेल आवाजात इतर आवाज मारला जातो. मुतारीत दोनच संडास आहेत. पाच-सहा माणसं एकाचवेळी एकामागुन एक अशी उभी असतात. लग्नातल्या थाळी सिस्टीमची आठवण होते.
स्टेशनच्या पच्छिमेला मधल्या मोकळ्या आवारात पंधरा-वीस पुरुष-बायका आपल्या पोराबाळांसह, बोचक्यांसह रात्रभर पडलेले होते. तिथंच त्यांच जेवणखाण करणं, मशेर्या लावणं, थुंकण, चुळ भरण चालू होतं. दिवसभर फिरुन भांडी विकून कपडा गोळा करायचं काम ते करतात. आणि गोळा केलेले कपडे सकाळी पाच वाजता चिंधी मार्केट मध्ये जाऊन विकतात.
एक चायवाला अण्णा सकाळी चार वाजता गेटवर चहा-सिगरेटी विकत उभा होता. त्या आधी त्याचा भाऊ होता. याच्याकडे धंदा सोपऊन तो स्टेशनात जाऊन झोपला होता. तो वॉचमनची नोकरी संपऊन आला होता. गेली चाळीस वर्ष हे त्यांच काम चालू आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या मागच्या झोपडपट्टीतच तो राहतो.
रात्री अकराच्या सुमारास एक बावीस-तेवीस वर्षांची मुलगी आपल्याच मुडमध्ये चालत स्टेशनच्या मागाच्या बाजुस असलेल्या बसस्टॉपकडे जाताना पाहिली. अंदाज होताच. खात्री नव्हती. कुतुहलानं तिच्यामागनं गेलो. बसस्टॉपचा काळोखा कोपरा धरुन ती उभी राहिली. आळीपाळीनं तिच्याजवळ माणसं जात- येत होती. दोनचार वाक्यानंतर मागं वळत होती. मी ही गेलो. म्हणाली हजार. लॉज का तिनसो. एसी रुम का पाचसो. आता ती गप्प. मी ही. तिनं माझ्या पायापासनं डोक्यापर्यंत नजर मारली. मला कळलं. मीही मागं वळलो. इकडे तिकडे पाहिल्यावर लक्षात आलं. तिच्याच सारख्या त्याच धंद्यातल्या आणखी पाच-सहा जणी. एकीकडे प्रवासी बॅग होती. मला ही तिची बॅगेची आयडीया आवडली. पन्नाशीची असावी. मराठी वाटली पण तेलगू निघाली. तिनं मला तेलगु येतं का असं तेलगुत विचारलं. मी नाही म्हणालो आणि हिंदीत सुरु झालं. तीनं, 'क्या हुआ' असं विचारलं. तिचा रोख मघाच्या मुलीबरोबर मी बोललो होतो त्याच्याकडे होता. तिनं तिची थोडक्यात बदनामी केली. वो लोग कैसा फसाते है सांगीतले. चलो, म्हणाली छेसो. मी विचारलं, लॉजका कितना? तर म्हणाली नही इसमेही सब हो जाएगा. माझ्या मित्राकडे बघुन ती म्हणाली, दोनोका आठसो. मी काहीच बोललो नाही. ती हसली. आणि चार-सहा पावलं दुर जाऊन उभी राहीली.
रात्री दोन वाजेलेले असावेत. दिनशॉ पेटीट गार्डन समोर एक बाई आपल्या तहान्या मुलासह झोपली होती. झिंगलेली होती. तिथं एक घाइघाईत तिच्याच वयाचा पंचविशीतला एक गर्दुल्ला आला. ती बाई कुशीवर होती. त्यानं तिला उताणी केलं. तिच्या पायजम्याची नाडी सैल केली आणि पायजमा गुढग्यापर्यंत खाली खेचला. त्यानं त्याच्या पॅन्टची चैन स्वत:च काढली. पुढची पाच-सात मिनटात काम संपलं. तो उठला. निघुन गेला. त्या बाईनं आपलाच आपण पयजमा वर केला आणि कुशीवर पुन्हा झोपली. पहिल्यासारखी निर्जीव.
पुढे डी.एन रोडवर एक चकाचक मुतारी आहे. इंग्लीश वाटावी अशी. रात्री बंद असते. तिच्या दारासमोर चटई टाकून एक काटकुळा भय्या एका जाडजुड बाईला दाबत बसला होता. ते बघत असताना एका माणसानं हटकलं. क्या देखते हो, असं सुरात विचारलं. कुछ नही. मी म्हणालो. त्याच्या कानाच्या पाळीत हिर्याचा खडा चमकत होता. त्यानं गेली दोन-अडीच तास आमच्यावर पाळत ठेवली होती. आणि त्याच्या रेंजमध्ये आल्यावर तो खुश झाला होता. चलो ना...जाओगे क्या?... त्यानं विचारलं. तेव्हा खात्री पटली. तो ही याच धंद्यातला 'माणूस' होता. प्रत्येक शब्दागणीक तो गालातल्या गालात हसत होता. एक बार आओगे तो बार बार आओगे असं आत्मविश्वासानं म्हणाला. बाईमध्ये आणि पुरुषामध्ये (अर्ध्या) काय फरक असतो ते त्यानं सोदाहरण समजाऊन सांगीतलं. त्यान मला विचारलं काय करतो म्हणून मी ही त्याला विचारलं. तर तो लिफ्टमन होता. त्याच बिल्डींगच्या जिन्याखाली तो रात्रीही झोपतो. त्याचं नाव अनील. मुळ दिल्लीचा. थर्माकोलसारखी त्याची गोरी कातडी होती. खाजवली-खरवडली तर पाढंरा भुसा उडाला असता. खुपच खनपटीला आला. म्हणाला देखो तो सही. त्यानं तिथंच बाजुला असलेल्या जिजाऊ लेनमध्ये त्याची झोपायची आणि काम करायची जागा दाखवली. त्याचा नंबरही स्वतःहुन दिला. म्हणाला तुमको नही सही लेकीन दिलवालोंके काम आयेगा.

Thursday, June 3, 2010
हो जाएगा साब...!!!
पुर्वप्रसिध्दी # महाराष्ट्र माझा - संपादक: शिरीष पारकर # जून २०१०
रात्रीचे साडे दहा वाजलेत. दारावरची बेल वाजते. समोर सत्तरीतला म्हातारा. घामानं नखशिखांत भिजला आहे. डोक्यावर पाटी. त्याच्या थरथरत्या देहाकडे पाहतांना अंदाज येत होता, त्या पाटीत तिसेक किलोचं वजन असावं. तो हसत विचारतो, बेटा कलिंगड लोगे क्या? ...मी काहीच बोलत नाही! बोलूही शकत नव्हतो. मी त्याच्या ओघळलेल्या अवताराकडे बघत बसलो. सफेद रंगाचा मळकट कुडता आणि त्याच रंगाचं धोतर. पायात चपला. झिजलेल्या. काळपट रापलेलं शरीर. तिसर्या मजल्यापर्यंत तो चढून आला होता. त्याला धाप लागली होती. त्याच्या दोन श्वासामधलं अंतर पार मिटून गेलेलं होतं. आशाळभूतपणे तो माझ्याकडे पहात होता. आणि मी त्याचा चेहर्यात माझ्या आजोबांचा चेहरा शोधत होतो. मला कळत होतं, की आत्ता त्याच्याकडचं कलिंगड विकलं जाण्यापेक्षाही त्याला कुणीतरी किंवा मी तरी म्हणायला पाहिजे की, बसा इथं दोन मिनटं पाणी प्या. मग काय ते बोला...
'बहुत मिठा है बेटा' तो पुन्हा बोलला. भानावर आलो. मी म्हणालो, 'नही चाहिये. माफ करना 'तो पुढच्या दारावर गेला. एक एक दरवाजा करीत आल्या पावली निघून गेला. (मनात होतं पण फक्त दयेपोटी मला कलिंगड घ्यायचं नव्हतं. भावनेच्या भरात केलेले व्यवहार फसतात असा माझा अनुभव आहे. त्या अनुभवाचा राग मी त्याच्यावरही काढला होता.)
मी विचार करीत राह्यलो, दिवसभर तो अशीच वणवण करीत किती भटकला असेल? तो आज किती चालला असेल? त्यानं दुपारी काय खाल्लं असेल? किती विनवण्या केल्या असतील? किती याचना केल्या असतील? किती शिव्या खाल्या असतील? आणि किती कलिंगड विकली असतील? कुठल्या मराठी माणसाच्या डोक्यावरची पाटी या भय्यानं हिसकाऊन घेतली असेल? कुणाची रोजी-रोटी छिनली असेल?
त्या भय्याला असं वाटलं नसेल का की, मराठी माणसासारखं संध्याकाळी वेळेवर घरी जावं. गरमागरम चहा घ्यावा. दिवसभराचा राग घरादारावर काढावा. बायकापोरांना शहाणपणा शिकवावा. आजुबाजुचे आपल्यासारखे चार-सहा गोळा करावे. उघडया गच्चीत उघडया अंगाने पत्याचा डाव मांडावा. गरम हवेवर, हापूस आंब्यावर, क्रिकेट, राजकारण, सिनेमा यावरती तोंडसुख घ्यावं. सिरिअल, रिऍलिटी शो यांच्या संगतीत रमाव. सत्संगाला जावं. बाबाबिबांच्या बैठकांना हजेरी लाऊन अध्यात्म समजून घ्यावं. त्यांच्याकडून आपण मेल्यानंतर आपलं काय होणार हे जाणून घ्यावं. पण तो यातलं काहीच करीत नाही. तो काम करीत राहतो. अधिक मेहनत करतो. चार पैसे अधिक मिळवतो.
माझ्या एका मित्राला एका मंत्र्याला पत्र द्यायचं होतं. ते हातानं लिहिलेलं कसं द्यायचं म्हणून तो टायपिस्ट शोधत फिरला. सापडला तो एकदम कंप्युटराइज्ड. म्हणजे सोने पे सुहागा. टायपिस्टही तेज निघाला. खटा-खट पत्र मारुन झाल्यावर, कितना कॉपी असं त्यानं मित्राला विचारलं. आधी वाचायला दे, असं म्हटल्यावर हा गडी भडकला. टाईम नही है. चाहिये तो लेलो...नही तो डिलीट करु क्या? यावर मित्र म्हणाला एका कॉपीचे जादा पैसे घे पण मला वाचायला दे, कुठं काही चुक रहायला नको. असं म्हणाल्यावर हा भाई जास्तच भडकला. आम्हाला काय टायपींग येत नाही काय. उगाच बसतो काय इथं मंत्रालयासमोर. शेवटी टाईप केलेल्या कागदाचे प्रींट आणि पैसे न देता- घेताच विषय संपला. कुतुहल म्हणून त्यानं त्याच्याशीच चौकशी केली तर तो मराठी निघाला.
त्या मराठी माणसाच्या डोक्यात एखाद्या गुजराती-मारवाडी माणसासारखा विचार का आला नसेल? की या जागेत बसायचं मला भाडं द्यावं लागतं. विज, कम्पुटर, इंटरनेट, स्टेशनरी, कम्युनिकेशन साठीही खर्च करावा लागतो. हाताशी माणूस ठेवलेला असतो. त्याच्यासोबत आपलाही मेहनताना असतो. सगळा खर्च भागून काही अधिकचंही उरायला पाहिजे कारण आपण व्यवसाय करतो. आणि सगळ्यात मह्त्वाचं की, आता झाला त्या व्यवहारात 'डिलीट' हे बटण प्रेस करायला जेवढा वेळ लागतो तेवढीच ताकद आणि वेळ 'प्रिंट' हे ही बटन प्रेस करायला लागतो. पण प्रिंट हे बटण दाबल्यामुळे त्याला त्याचे पैसे मिळाले असते. आणि प्रिंट मारायच्या आधी तर त्याने टाईपही केलं होतं. म्हणजे वेळ आणि मेहनत दोनीही खर्च झाले होते. अधिक कॉपीचे अधिक पैसेही द्यायला समोराचा माणूस तयार होता. तरी ही तो असं करत नाही. चिडतो, भडकतो. या वागण्याच्या पध्दतीला "मराठी बाणा" असं म्हणतात.
माझा मित्र ज्ञानेश्वर यानं सांगितलेल्या एकाच दिवशी अनुभवलेल्या या दोनही घटना. काल्पनीक नाहीत. वास्तवावर आधारलेल्या आहेत. या दोनही घटनेतली पात्र नावं बदलून मुंबईत इथे-तिथे भेटतच असतात.
सेवा क्षेत्रात (म्हणजे सर्व्हीस इंडस्ट्री. समाजसेवा नव्हे. जो मराठी माणसाचा अत्यंत आवडीचा पार्टटाईम उद्योग असतो) मोडणारा कोणताही व्यवसाय घ्या. इथं कौशल्याला, वेळेला, शब्दाला अधिक किंमत असते. दिलेल्या शब्दात, दिलेल्या वेळेत दिलेलं काम पुर्ण झालं की कोणताही ग्राहक संतुष्ट होतो. तिथं पैसा ही दुय्यम गोष्ट असते. इथं एकच सेवा पुरवणार्या दोन माणसांना भेटा. त्यातला एक मराठी आणि दुसरा अमराठी निवडा. काही ठरावीक साच्यातले शब्द दोघाच्याही मुखातून बाहेर पडतील.
कुठल्याही दुरुस्तीच्या धंद्यातल्या माणसाला भेटा. तो भय्या असेल तर म्हणेल ...हो जायेगा साब. तो तुम्हाला पुर्णपणे विश्वासात घेऊन त्या कामाला सोपं करुन टाकतो. कोणताही पर्याय त्याला मान्य असतो. म्हणजे तुम्ही त्याला पुर्ण कॉन्ट्रक्ट द्या, मटेरिअल आणून द्या, किंवा नुसतीच मजूरी द्या. कामाच्या कुठच्याही पायरीवर तो नेहमी 'तयार' असतो. आपल्यासमोर तो काम सुरु करतो. तो धंद्याचं टायमींग साधतो. ऍडव्हान्स घेतो. पुर्ण पैसे येइपर्यंत तो तुमच्यासमोर रडतो. आणि काम पुर्ण करुन लवकर अश्यासाठी देतो की त्याला पुढचा माणूस, गिर्हाईक किंवा कदाचित बकरा शोधायचा असतो. तो गुंतून रहात नाही. रिसर्चच्या भानगडीत तो अजिबात पडत नाही.
याउलट मराठी कारागीर बघा. आधी तो धंद्याच्या जागेवर पहिल्या भेटीत भेटला तर एक लाख. भेटला तर तो आपल्या तोंडावर पहिलं वाक्य फेकतो की, साहेब परवडत नाही. म्हागाई वाढली. धंद्याच्या लायनीत पयल्यासारखी मजा नाही. वैगेरे. तरीही मराठी माणूस म्हणून त्याच्याकडे आपण काम देतो. कामाचे पैसे त्यानं जास्तच सांगीतलेले असतात. आपण ते अश्यासाठी देतो की........ राज ठाकरे! भय्यासारखी तो थुकपटटी लावणार नाही, असं आपल्याला उगाचंच वाटतं. तो काम घेतो पण ते आपल्यासमोरच बाजूला ठेवतो. खोलायला लागेल, बघायला लागेल, दाखवायला लागेल म्हणतो. उद्या या असं सांगतो. चहा पिणार का, विचारतो. आपण साशंक मनाने तिथुन निघतो. त्यानं दिलेल्या वायद्यापेक्षा एक दिवस उशीराच जाउया म्हणून पोहचतो तर त्यानं कामाला हातच लावलेला नसतो. आपल्यासमोर तो धुळ झटकतो आणि आत्मविश्वासाने सांगतो. साहेब उद्या...उद्या....नको नाही तर असं करा...परवा नक्की अगदी हंड्रेड पर्सेंट घेऊन जा.

Tuesday, May 25, 2010
केईएम : रात्रीची एन्ट्री आणि एक्झिट
पुर्वप्रसिध्द्दी- महानगर # संपादक - वृंदा शरद बाळ # मे-२०१०
मुंबईचा सगळा इतिहास पुसुन उद्या जागोजागी मॉल्स उभे राहिले तरी चालतील. पण केइएमच्या जागी दुसरं काही उभं राहता कामा नये. मुंबईच्या चकचकीत रस्त्यांवर अलिशान गाडया फिरुदे, काचांचे टॉवर्सही उभे राहुदे, जगभरातले ब्रॅन्डस मुंबईकराच्या अंगाखांद्यावर खेळूदे. पण केईएमचं साधेपण तसंच राहुदे. कारण मुंबईतल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्याही गरीब माणसाला त्याच्या आजारपणात मायेनं जवळ घेणार एकमेव ठिकाण म्हणजे केईएम हॉस्पिटल. गेलं पाउण शतक या वास्तुनं गरीबाला आपलंसं केलं आहे, त्याला कुणाची दुष्ट लागू नये.
जवळजवळ साडेपाचशे निवासी डॉक्टर्स असलेलं अठराशे खाटांचं हे हॉस्पिटल दरवर्षी साधारणतः लाखभर रुग्णाना प्रत्यक्ष दाखल करुन घेऊन त्यांच्यावर उपचार करीत असतं. आणि साध्यासुध्या आजारपणासाठी नुसत्या वरवरच्या तपासण्या, इंजेक्शन, औषध-गोळ्या घेऊन जाणार्यांची संख्या तर दहा लाखांच्यावर आहे. लांबरुंद पसरलेल्या या दगडी वास्तूला तिचं एक व्यक्तिमत्व आहे. तिची एक ओळख आहे. आरोग्य या अत्यावश्यक आणि कमर्शीअल बनत चाललेल्या सेवेच्या दुनियेत केईएमचा साधेपणाच ग्रेट वाटतो.
आजारी माणूस सहसा एकटा कधीच हॉस्पिटल मध्ये दाखल होत नसतो. त्याच्यासोबत किमान चार-सहा माणसं तिथं हजेरी लावतातच लावतात. म्हणजे केइएम हॉस्पिटलनं कितीतरी माणसांचा जन्मापासून मृत्युपर्यंतचा प्रवास पाहिला असेल. त्या प्रवासातील असंख्य अडथळयांचे डोंगर पाहिले असतील. आजारातून निर्माण होणार्या यातना, दु:ख, भोग अनुभवले असतील. केईएम ही निर्जीव वास्तू आहे म्हणून ठीक अन्यतः त्या वास्तूला जर माणसासारख्या भाव-भावना असत्या तर ती वास्तू कधीच कोलमडून गेली असती. माणसाच्या दु:खाचं महाभारत केईएमनं पचवलं आहे. यापुढेही हा सिलसिला असाच चालत राहणार. रहायला पाहिजे.
दिवसभराचा उकाडा संपून उघडया रस्त्यावर जराशी हवा खेळते आहे. रात्रीचे साडेबारा वाजून गेलेत. केईम समोरच्या सिग्नलचे सगळे दिवे बंद होऊन आता फक्त ऑरेंज रंगाच्या दिव्याची उघडझाप होते आहे. हॉस्पिटलच्या आणि काळोखाच्या पार्श्वभुमीवर ऑरेंज रंग किती भयानक दिसू शकतो. याची कल्पना इथे होते.
केईएमच्या गेट क्रमांक दोननं आत गेल्यावर तिथं एक मोकळी लॉबी आहे. उजव्या बाजूला दिवसरात्र चालणारं केमिस्टचं दुकान. तिथुनच दहा पावलावर ओपिडी. तीही रात्रभर चालू. बाहेरुन आलेला पेशंट तिथं दाखल केला जातो. रात्री अकरानंतरही अधूनमधून कुणी ना कुणी तिथं येतच होतं. आलेल्या प्रत्येक पेशंटला सावरण्यासाठी आठ-दहा माणसं असतात. पण पेशंट बरोबर आत फक्त एकच रहा असं सांगायला सिक्युरिटी,डॉक्टर, काहीवेळेला पोलिसही येतात. हेच सांगणारी दारावर पाटी आहे. पण तिचा काही उपयोग नसतो. यात सगळ्यांचीच दहाएक मिनिटं मोडतात. पण याला इलाज नसतो. शेवटी पेशंटसोबत उरतो तोच त्याच्या जवळचा. बाकीचे सगळे आप्तेष्ठ, सगे सोयरे आणि मित्रपरिवार. जे बाहेर आसपास रेंगाळत राहतात.
त्याच लॉबीत डाव्या बाजूला संयोग गणेश नावाचा गणपती आहे. काहीना विषेशतः पेशंट सोबत येणार्या कार्यकर्त्यांना त्याची माहीती असते. ते त्याच्या पुढयात येतात. पायातल्या पायात चपला-बुट सरकवतात. खडेखडे पाया पडतात आणि निघुन जातात. मग त्याचं बघुन कुणी त्याच्यानंतरही तेच करतात. हे थोडावेळ चालतं. मग पुन्हा शांतता.
याच चौकोनी परिसरात रात्री माणसं मारुन टाकल्यासारखी इतस्ततः पडलेली असतात. पिशवीचा- चपलेचा आधार उशाला घेऊन. ते ही न मिळाल्यास हाताच्या मनगटावर डोकं ठेऊन रात्रभर पडून राहतात. मिळालाच तर एखाद्या वर्तमानपत्राचा तुकडा घेऊन तिथंच पसरतात. काही माणसं जागीच असतात. अधुनमधुन एखादी डुलकी. अन्यतः टकटक इकडंतिकडं भांबावल्यासारखी बघत. एखाद दुसरा एकमेकांशी बोलत, गप्पा मारत असतात.
तासा दोन तासानी पंधरा-वीस जणांचा घोळका निशब्द चेहर्यांने ओळीत बाहेर पडतांना दिसतो. ही खुण माणूस गेल्याची असते. काहीच्या डोळयात पाणी तरारलेलं असतं. कुणाचा हात कुणाच्या खांद्यावर असतो. जन्ममृत्युमधला खेळ कुणीतरी कुणालातरी सांगत-समजावत असतो. सगळं संपल्यानंतरची हतबलता किंवा सुटल्याचे भाव एकमेकांच्या चेहर्यावर पसरलेले असतात. त्यातल्याच कुणाचीतरी सराइतपणे पुढची तयारी सुरु होते.
रात्री दिड-दोनच्या दरम्यान एक म्हातारा हॉस्पिटल्च्या मागच्या बाजूस ३१ नंबरच्या खिडकीवर जिथं औषध मिळतात तिथं ठोठावत होता. विचारलं. तर म्हणाला, " देखो ना, कोई नही है". खिडकीतला दिवा लागलेला होता. तिथला माणूस जाग्यावर नव्हता. तिथं बहुदा औषध फुकट मिळत असावीत. त्या माणसाच्या नाकातून रक्त गळत होतं, काय झालं असं खुणेनंच विचारलं. तर रडायला लागला. पैसे नाहीत म्हणाला. हातातला केसपेपर, औषधाच्या चिठठया दाखवायला लागला. काय झालं म्हणून पुन्हा विचारलं, तर अर्ध्याकच्च्या मराठी हिंदीत म्हणाला, काळाचौकीतून आलोय, तिथं एक माणूस बायकांसमोर दारु पिऊन अचकट विचकट चाळे करीत होता. याला त्याचा राग आला. म्हणून विचारलं तर त्यानं याच्या अंगावर हातातली बाटली फेकून मारली. डोळा वाचला. नाकाच्या वरती फाटलं होतं. रक्ताचा ओघळ थांबत नव्हता. डॉक्टरनंही मलमपटटी न करताच त्याला इकडं औषध आणायला पिटाळला होता. आणि हा खिडकीवर ठोठावत होता. तो पण प्यायलेलाच होता. त्यामुळे खिडकीवर ठोठावण्याचा वेग आणि आवाज वाढत गेला.
गेटवर गाडी उभी राहिली की गेटसमोरचा आडवा दांडा आपोआप वर येतो. तपासायच्या भानगडीत कुणी पडत नाही. जागोजागी सिक्युरीटी आहे. पण सुस्त. काही अघटीत घडल्याशिवाय यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे खुर्च्या गरम करीत जो तो आपापल्या जागी बसलेला असतो. सगळ्या मुंबईची सिक्युरीटीची जबाबदारी उत्तरप्रदेशी मुलं सांभाळत असताना इथे सगळे मराठी. हे ही काही कमी नाही.
पहिल्या मजल्यावर लांबचलांब गॅलरीत दोनही बाजूला माणसं पडलेली असतात. अधेमधे लाकडी बाकडी आहेत त्यावरही कुणी झोपलेला असतो. इथं बसल्यावर लक्षात येतं. लाकडी बाकडयावरची माणसं अधुनमधुन वळवळत असतात. आजुबाजुशी बोलल्यावर कळलं की, रात्री ढेकुण जागे असतात. इथल्या शांततेला भंग करणारी एक पाण्याची संततधार खाली पडत असते. हे पडणारं पाणि एसीचं असावं असं वाटतं कदाचित टाकी ओहरफ्लो सुध्दा होत असावी. पण हा आवाज आपल्याला टाळता येत नाही. केईएमचे व्यवस्थापन या आवाजाला का टाळत असावे?
तरुण डॉक्टर्स जिन्सच्या पॅन्टस. सफेद डगला आणि गळ्यात स्टॅथोस्कोप घेऊन इकडून तिकडे. अधुनमधून बाहेर ज्युस सिगरेटी किंवा काही खाण्यापिण्यासाठी फिरत असतात. गरीब पेशंटच्या आजुबाजूला ही गोरी-गोमटी तरुण डॉक्टर पोरंपोरी फारच श्रीमंत वाटतात. या हॉस्पिटलमध्ये येणारे बरेचसे रुग्ण गरीबच असतात, त्यांच्याशी वागण्याची डॉक्टरांची पध्दत पाहिली की कधीकधी अश्या ज्युनीअर डॉक्टरांना फटके का पडतात याची कल्पना करता येते.
नर्सेसची लगभग चालू असते. सिनिअर नर्स फोन आणि खुर्ची सोडत नाही. काहीतरी लिखाण चालू असतं, कुणावरतरी ओरडणं चालू असतं. पण ज्युनीअर इकडे-तिकडे येरझार्या मारीत असतात. त्यातून आया नावाची जमात बिनधास्त वावरताना दिसते. चेहर्यावर तिटकारा आणि तोंडाचा पटटा चालू अश्या अवस्थेत त्या काम करीत असतात. वॉर्डबॉय आपल्याच तोर्यात कानाला हॅन्डस फ्री लाऊन गाणी ऐकण्यात किंवा बोलण्यात दंग असतात. बरेचसे रुग्णांचेच नातेवाईक स्ट्रेचर इकडून तिकडे नेताना दिसतात. हे काम वॉर्डबॉयचं आहे हे कुणी कुणाच्या लक्षात आणून द्यायचं?
केइएम परिसरातलं आदिती, ओन्ली फिश, व्हेज ऑलवेज सारख्या चकचकीत हॉटेलच्या तुलनेत मिलन हॉटेल अनेकानां आपलं वाटतं. त्या होटलनं आपला गरीब चेहरा गेली अनेक वर्ष आहे तसाच ठेवला आहे. फुटपाथ पुर्णपणे अडवून बसलेल्या या हॉटेलांनी आजवर कित्तेक महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचे खिसे गरम केले असतील. त्याचं त्यानाच ठाऊक. अधुनमधुन महानगरपालिकेकडून फुटपाथ साफ केली जातात, अतिक्रमणावर हल्ले केले जातात, पण पुन्हा दुसर्या-तिसर्या दिवसापासनं परिस्थीती जैसे थे.
हॉटलामध्ये जाऊन बसून खाण्याइतपतही ज्यांची ऐपत नाही त्यांच्यासाठी बुर्जीपाव, राईस, पावभाजी च्या गाडया अगदी कामगार मैदानापर्यंत उभ्या असतात. बारा-पंधरा इंचाच्या तापलेल्या लोखंडी तव्यावर तेल आणि पाण्याचे फवारे चरचरत असताना पाहणं मोठं मजेशीरच. भाजीला आलेल्या उकळ्या आणि बुर्जीला सुटत असलेलं तेल पाहतांना नकळत भुक लागल्यासारखी वाटते. आजपर्यंतच्या माझ्या खानपानाच्या अनुभवात पावभाजी या जोडगळीतले पाव नरमच असतात. इथे एका माणसाने कडक पाव असं म्हटल्यावर मी कुतुहलानं पाहिलं तर. भाजी करणार्या पोरानं पाव पोटात फाडून त्याला उलटा शेगडीला पालीसारखा चिकटवला. पाव दोन मिनटात नरमचा कडक झाला होता.
या गाडया बाराच्या पुढे थांबत नाहीत. कारणं तिच. पोलीस वैगेरे. पण नंतर अगदी केईएमच्या दारावरच रात्रभर ऑमलेट बनवणारी बाकडी असतात. पेशंटचे नातेवाईक, पिऊन चुकलेले, भुकेलेले आणि टॅक्सीवाले मात्र यावर तुटून पडलेले असतात. चहा तर असतोच. सिगरेटी, गुटका, तंबाकू यांचीही सोय असते.
केईएमच्या गेटवर निपचित उभ्या असलेल्या ऍम्बुलन्स आपलं चित्त वेधुन घेतात. गर्दीला भेदून रोरावत जाणार्या या अऍम्बुलन्स आता दबा धरुन बसल्यासारख्या वाटतात. ऍन्बुलन्सच्या सफेद रंगावर उलटया क्रमाने लिहिलेली लाल अक्षरे वाचवत नाही. कितीतरी माणसांनी यातच आपला प्राण सोडला असेल. कितीतरी जणानी मृतुनंतर स्मशानापर्यंतचा प्रवास केला असेल.
रात्रीच्या गडद शांततेत एखादी ऍम्बुलन्स भोंगा वाजवत आत शिरते. तेव्हा इथं उभ्या असलेल्या प्रत्येकाचेच डोळे कान टवकारतात. नकळत ऍम्बुलन्सच्या दिशेने माना वळतात. उताणी पडलेला पेशंन्ट. त्याला सावरणारे त्याचे नातेवाईक. लगबघीनं पुढ आणली जाणारी स्ट्रेचर. दोन-पाच मिनिटांचा हा खेळ. पुन्हा जो तो आपापल्या व्यापात.
केईएमच्या परिसरात रात्र गजबजलेली नसली तरी जागी असते. कारण कोण, कधी, कसे एन्ट्री आणि एक्झीट घेईल माहीत नसते. त्यामुळे बाकी उरलेल्यांचा जन्म आणि मृत्युच्या मध्ये थांबून टाईमपास चाललेला असतो.

Sunday, May 23, 2010
आता पुन्हा भेटू १ मे २०२०...!!!
पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # मे-२०१०
अश्याप्रकारे १ मे २०१० या दिवशी महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सव साजरा झालेला आहे. मागच्यावेळी म्हणजे १९८५ साली आपण रौप्य महोत्सव (जो २५व्या वर्षी करतात) साजरा केलेला होता. तसे आता पुन्हा भेटू एकदम दहा वर्षानंतर १ मे २०२० या दिवशी. कारण तेव्हा महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीला ६० वर्षे झालेली असतील. साठीला ... महोत्सव म्हणतात. त्यानंतर पंचाहत्तरी (म्हणजे अमृत महोत्सव). शेवटी शंभरी (म्हणजे हिरक महोत्सव) शंभरी मात्र वर्षभर साजरी करण्याची पध्दत असते. त्यामुळे ते वर्ष हरेक प्रकारे आणि चवीचवीनं साजरं होत राहणार. थोडक्यात शंभरीला कुणावर तसा म्हणजे आता सारखा स्ट्रेस नसणार. एकदम आपापल्या सोइप्रमाणे. समोरचा कोणते इव्हेन्ट करतो आहे? कोणत्या आयडीया वापरतो आहे? कोणते कलाकार नाचवतो आहे? कोणाला गाववतो आहे? किंवा कोणाला धाववतो (म्हणजे प्रायोजक, जाहिरातदार या आर्थाने) आहे? काडीचाही संबधं नसला तरी अश्यावेळी पुरस्कार वैगेरे दिले जातात. ते कुणाला द्यायचे? या सगळ्याचा अंदाज घेत घेत युक्त्या लढवल्या जातील. समोरच्या पेक्षा आपली आयडीया जड गेली पाहीजे याची प्रत्येकजण काळजी घेईल. काही पत्रकार सगळ्यांचे मित्र असतात. त्यामुळे(च) आयत्यावेळी(च) गोची(च) होते. यार्षीच्या अनुभवावरुन तो अति संवेदनशील विभाग स्वतंत्रपणे हाताळला जाईल. बर्याच वेळेला म्हणजे त्या त्या वेळेला त्या त्या माणसांचं महत्त्व असतं. म्हणजे यावर्षी जसे बाबासाहेब पुरंदरे सगळ्यानी पुरवून पुरवून वापरले तसे. त्यामुळे तश्या ऐतिहासिक माणसांचं ऍडव्हान्स बुकींग करुन ठेवण्यात येईल. एकुण काय पुढची दहा आणि त्यापुढचे अंतराअंतरावरचे गॅप भरेपर्यंत आपण रिकामे बसुयात. यापेक्षा आपण काय करु शकतो.
कोणत्याही व्यक्तीच्या, घटनेच्या, संघटनेच्या जन्मानंतर या(च) वर्षाना महत्त्व येतं किंवा असतं. ते वर्ष पुर्ण झालं की निदान भाषण करणार्याला, लेखन करणार्याला पहिलं वाक्य तरी आयतं मिळतं. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीला ६० वर्ष पुर्ण झाली तरी... अजून अमकं ढमकं झालं नाही... इ...इ... (या गाळलेल्या जागेत काहीही टाकून बघा. एकदम फिटट बसतं) ...याचा काय संबध? पण आपलं अशी वाक्य वापरायला, ऐकायला, वाचायचा बरी वाटतात. बोलणार्याला काही बोलल्यासारखं वाटतं. ऐकणार्याला काही ऐकल्यासारखं वाटतं.
१ मे हा दिवस मराठी माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचा आहेच. तो का आहे हे इथे समजून घेतलं पाहिजे. (माहीती आहे त्यांनी वाचू नये) राज्यांची निर्मीती करतांना किंवा राज्यांच्या सिमा ठरवतांना भाषावार रचना असावी म्हणजे ते राज्यांच्या विकास, प्रशासन या सगळ्याच अंगानं सोईचं होईल. हे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधीपासनंच म्हणजे जेव्हा १९२० साली कॉग्रेसची घटना तयार करण्यात आली तेव्हापासनंच ठरलं होतं. मोतीलाल नेहरु, तेज बहादूर सप्रू इ. मंडळी ते ठरवीत होती. पण पुढे मुंबईच्या बाबतीत धन-दांडग्यांचा हस्तक्षेप वाढत गेला. आणि चित्रही बदलत गेलंय. इंग्रजांच्या काळापासनंच मुंबई सधन होत होती. इथला व्यापार- उदीम, अर्थकारण श्रीमंतांना भुलावीत होतं.
१९४६ साली बेळगावला मराठी साहित्य संमेलन झालं. त्यात पहिल्यांदा "संयुक्त महाराष्ट्र" या मराठी भाषिक प्रांताची मागणी करण्यात आली. त्याठिकाणी साहित्य संमेलनात राजकीय नको म्हणून नंतर शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै १९४६ रोजी "संयुक्त महाराष्ट्र परिषद" अशी सर्वपक्षीय आणि अपक्षीय संघटना स्थापन करण्यात आली. या समितीने दार कमिशन जे भाषिक राज्यांच्या प्रश्नावर काम करीत होते, त्यांना निवेदन दिले. दार कमिशनचा रिपोर्ट १९४८ साली प्रसिध्द झाला. त्यात त्यांनी भाषावार प्रांतरचना अमान्य केली होती. मग त्याचा फेरविचार करण्यासाठी जे.व्ही.पी. समिती (जयरामदास दौलतराम, वल्लभभाई आणि पट्टाभी सितारामय्या) स्थापण्यात आली. त्या समितीची "भाषावार राज्ये तुर्त बनवूच नयेत पण ती बनवायची असल्यास मुंबई शहर वगळून संयुक्त महाराष्ट्र द्यावा", अशी शिफारस होती.
पुढे १९५३ साली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. पुढचं एक वर्ष हा आयोग फक्त निवेदने स्विकारीत होता. १९५५ साली त्याचा अहवाल आला आणि महाराष्ट्राचा पुर्णपणे भ्रमनिरास झाला. त्यानंतर पुढे याच विषयावर १९५५ साली फजलअली कमिशनचा अहवाल प्रसिध्द झाला. त्याचाही नूर तसाच होता.
एकूण काय तर, समित्यांवर समित्या निर्माण होऊनही भाषावार प्रांतरचनेचा तिढा सुटत नव्हताच किंबहुना तो अधिकच किचकट बनत होता. १९५६ च्या जानेवारीत १६ तारखेला पं. नेहरुनी त्रिराज्य योजना जाहीर केली. महागुजरात, मुंबई आणि विदर्भासह महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रात बेळगावमधील कारवार नव्हते हैदराबादचा बिदर जिल्ह्याचा मराठी भागही नव्हता. मुंबई तर नव्हतीच. आधीच कट केल्याप्रमाने त्यादिवशी मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. आणि अपेक्षेप्रमाणे दुसर्या दिवसापासूनच मुंबईत धुमच्छक्री चालू झाली. जानेवारी १५ च्या रात्री प्रबोधनकार ठाकरे, नाना पाटील, कृष्णा देसाई, लालजी पेंडसे, गुलाबराव गणाचार्य अशा जवळजवळ २९ जणाना अटक करण्यात आली. त्यानंतर गिरगावात ठाकूरद्वार इथे दंगल उसळली. आंदोलकांनी दोन ट्रामगाडया आणि बसेस जाळण्यात आल्या. त्या रात्री बंडू गोखले नावाचा नाइट स्कुलचा विद्यार्थी पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला. तोच पहिला हुतात्मा. आणखी चार जणाना गोळ्या लागल्या. आणि त्यानंतर मुंबईने पेट घेतला तो घेतलाच.
याच काळात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात १०६ माणसे मारली गेली. ४५००० स्त्री-पुरुषांनी तुरुंगवास भोगला.३२ आमदारांनी राजीनामे दिले होते. या लढयाची परिणती ही की केंद्राला अखेर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र द्यावाच लागला. तोच तो दिवस १ मे १९६०. ज्याला आपण महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस असेही म्हणतो. ज्या स्वतंत्र महाराष्ट्र राजाचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बनले.
१९४६ ते १९६० या १४ वर्षांच्या काळातला या लढयाचा खरंतर तिढयाचा हा धावता आढावा. या लढयात जे मेले ते गेलेच. जे लढले ते सुध्दा आता सगळे शिल्लक नाहीत. त्यातले काही मरता येत नाहीत म्हणून अजून जिवंत आहेत. त्यातले चंदू भरडकर मित्राच्या मेहरबानीनं जगताहेत, आत्माराम पाटील अजूनही परळच्या चाळीत राहताहेत. यावेळी यापैकी कुणाचीही याद कुणालाच नव्हती.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबई धनदांडग्यांच्या हातात जाऊ नये यासाठी होता. वस्तुस्थीती अशी आहे की, पुर्वीपासूनच मुंबई व्यापार्यांच्या, धन-दांडग्यांच्याच हातात होती पण ती महाराष्ट्रापासून तुटली असती किंवा स्वतंत्र झाली असतं तर तसं त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालं असतं. हे म्हणजे थेट लग्न नाही पण लिव्ह-इन-रिलेशनशीप सारखं झालं. मालकी म्हणजे तरी काय, तर ज्याच्याकडे सत्ता, संपत्ती आणि अधिकार आहेत त्याची असे मानले तर हे सर्व अमराठी माणसांच्याच हातात जास्त होतं हे लक्षात येईल. पैशाने मालली हस्तांतरीत होत असते. आजही जमीन, पैसा, स्थावर- जंगम मालमत्ता (असेट) अमराठी माणसाच्याच नावावर जास्त आहे. मराठी माणसाच्या नावावर फक्त मुंबईची जबाबदारी (लायबिलीटी)आहे. विकत घेण्याची क्षमता (यात सुख, समाधान, ऐशोआराम, वस्तूंपासून मुंबईपर्यंत सगळं येतं) आजही आणि तेव्हाही अमराठी माणसाकडे जास्त होती. मराठी माणूस फक्त विकू (यात घरातले कपडे-भांडी, दागीन्यांपासून वडिलोपार्जीत मोक्याच्या जमीनीपर्यंत सगळ येतं)शकतो. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मीतीनंतरही मुंबई काय पुन्हा गरीबाच्या, मराठी माणसाच्या हातात आली नाही. येणारही नाही. जरा पेडर रोड, पाली हिल, मलबार हिल अगदी आता लालबाग,वरळी, परळ सुध्दा. इकडे जरा फेरफटका मारुन या म्हणजे कळेल की मुंबई मराठी माणसाची तेव्हाही नव्हती आणि यापुढेही असणार नाही. पुर्वी फक्त दक्षीण मुंबई नव्हती आता दाही दिशा नाहीत.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा ही एक घटना होती. त्यामुळे त्याची इतिहासात नोंद झालेली आहे. हा इतिहास यापुढे आपण आपापल्या सोईनुसार वापरणार. फक्त भुगोल बदलता येत नाही म्हणून मुंबई महाराष्ट्राच्या नकाशात दिसणार. आपण फक्त भावनेच्या भरात तिला माझी माझी म्हणत राहणार. आतापर्यंत हेच होत आलं आहे. यापुढेही हेच होत राहणार. १ मे ला आपण डोक्यावर घेऊन नुसते नाचत किंवा नाचवत राहणार. उधारीवर फटाके फोडत राहणार, कॉन्ट्रीब्युशन मध्ये रांगोळ्या काढून, लग्नात शिवलेले झब्बे-लेंगे घालून, शिवाजीच्या, भवानीच्या नावानं घोषणा देत. शोभायात्रा काढून, डीजे, बँड-बाजे बाजवत आपापल्या येरियात इकडून- तिकडे बोंबलत फिरणार.
दिवस उरलेल्यांचेच असतात. कालच्या पेक्षा उद्याचा दिवस नवाच असतो. त्यामुळे पिढिही बदलतच रहाते. आणि ती कालच्या पेक्षा अपडेट असते. हे जरी खरं असलं तरीही आपण त्या निमित्ताने या दिवशी तरी केवळ डांसीग मुड मध्ये असणं बरं नाही. लढले ते का लढले याचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे. मुंबई मराठी माणसाच्याच हातात राखण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. कर्तृत्वाची शपथ घेण्याचा हा दिवस आहे. फक्त वाजायला लागलं की हलायला लागतं. अश्या अवस्थेतून बाहेर पडण्याची मराठी माणसाला आता गरज आहे. म्हणून आता थेट साठीची, पंच्याहत्तरीची किंवा शंभरीची वाट बघाण्यापेक्षा अधून-मधून या लढयाचं स्मरण करीत रहावं. हुतात्म्यांच्या नावानं दुसर्यांना शपथा घालण्यापेक्षा आपणच आपल्यासाठी शपथ घालून घ्यावी. या निमित्ताने तरी का होईना मी मुंबईचा, महाराष्ट्राचा आहे, मुंबई, महाराष्ट्र माझा आहे म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेतलं पाहिजे.

Subscribe to:
Posts (Atom)